मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी सदर ब्लॉग तयार केलेला असून विविध विषयांवरील संकलीत तसेच स्व-लिखित लेख ब्लॉगवर प्रकाशित केले जातील. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी सबंधित माहिती एकाच संकेतस्थळावर उपलब्ध व्हावी,हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे. प्रकाशित करण्यात येणारी बहुतांशी माहिती संकलीत स्वरूपाची असल्यामुळे सर्वच माहिती सत्याशी पडताळा करून केलेली असेलच असे नाही तर अभ्यासकांनी तसा पडताळा स्वतः करणे अपेक्षित आहे.
Saturday, 6 September 2014
संत एकनाथ (संकलीत लेख,www.manase.org
संत एकनाथ
‘ज्ञानेश्र्वरी’ ची प्रत शुद्ध करण्यासह, उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी आणि ‘भारुडांतून’ रंजनासह समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक!
शांतीब्रह्म, ‘संत’ पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने सार्याच महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ! आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.
यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे त्यांचे पणजोबा. यांचे कुलदैवत सूर्यनारायण होते. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक‘पाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्म ज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.
एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी यांना मनोमनी वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली. साक्षात् दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी सद्गुणी, सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. तिचे सासरचे नाव गिरीजा होते. त्यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा होता. त्यांचा मुलगा हरिपंडित या नावाने प्र‘यात होता, परंपरेचा अतिशय अभिमानी होता. कवी मुक्तेश्र्वर हे नाथांचे नातू होत.
संत ज्ञानेश्र्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्यूत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते’एका जनार्दन’ म्हणून स्वत:चा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्र्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते.
एका जनार्दनी सोपा। विठ्ठलनाम मंत्र जपा।।
असा साधा-सरळ संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स.१५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला.
संत एकनाथांच्या वाङ्मंयाविषयी
श्रीएकनाथी भागवत
श्री एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायातील प्रमुख तीन ग्रंथापैकी एक होय. शब्दापुढे अर्थ धावे अशा सर्वसामांन्यांना समजणाऱ्या नेहमीच्याच नाथ भाषेत या ग्रंथाचे प्रकटीकरण झाले आहे. श्रीमद्भा गवताच्या बारास्कंधापैकी अकराव्या स्कंधावर नाथांनी जी टिका लिहिली अर्थात ज्या १४६७ श्र्लोकांवर मराठी भाषेत भाष्य केले ते म्हणजेच श्री एकनाथी भागवत होय.
प्रस्तुत ग्रंथाचे पहिले पाच अध्याय पैठण क्षेत्री लिहिले गेले असून उर्वरित २६ अध्याय हे काशी क्षेत्री लिहिण्यात आले मराठी भाषेचा कैवार घेत-
संस्कॄत वाणी देवे केली । तरी प्राकॄत काय चोरापासुनि झाली ? ।
असा खडा सवाल करून तेथील धर्म मार्तंडांना आपल्या भक्तिाज्ञानाने नाथांनी प्रभावित केले; परंतु काही जणांनी प्रस्तुत ग्रंथ भागिरथी मध्ये बुडवावा असा आग्रह धरला. ग्रंथ गंगेत तरल्यानंतर मात्र काशीवासियांतर्फे नाथभागवताची राजमार्गावरुन सोन्याच्या अंबारीत हत्तीावरुन शोभा यात्रा काढण्यात आली.
नाथ भागवतात भगवान श्रीकॄष्णानं उद्धवाला केलेला उपदेश प्रामुख्याने असून यात नाथांनी भक्तीाला पंचमपुरुषार्थ मानले आहे. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ठय असं कि, यात सर्व भिन्न भिन्न साधनांचा उत्त्त म प्रकारे समन्वय साधला आहे. कर्म,विवेक,वैराग्य,भक्तिअ,ज्ञान,योगादी साधनांचं महत्त्वा स्वतंत्रपणे प्रतिपादिलं असूनही परस्परात एकवाक्यता पहायला मिळते.विपुल प्रमाणात कर्म प्रतिपादन केलं असूनही कर्मठतेचा दुराग्रह त्यात नाही.
समुद्राप्रमाने शांत आणि गंगौधाप्रमाणे संथ वाहणारी नांथाची भाषा म्हणजे सहजता,सरलता,सुगमता,निर्मलता,भावपूर्णता, गंभीरतेचा एक सुरेल संगम आहे. एवढं सर्व असूनही त्यात अहंकाराला थारा नाही.ग्रंथ कर्तॄत्त्वा चं सर्व श्रेय नाथांनी श्रीगुरु जनार्दनस्वामींना दिलं आहे.
नाथ म्हणतात- बाळक स्वये बोलोनेणे । त्यासी माता शिकवी वचने ।
तैसी ग्रंथ कथाकथने । स्वये जनार्दन बोलाविजे ॥
भागवता विषयी आपलं मत व्यक्तज करताना नाथ म्हणतात - हे भागवत नव्हे तर अज्ञानी लोकांकरिता घातलेली पाणपोयीच आहे. संसार तरुन जाण्यासाठी मोठी नौकाच देवाने निर्माण केली आहे. स्त्री शूद्रादी सारे या नावेत घालून भजन भावाने एकाच खेपेत पलिकडच्या तीराला जाऊ शकतात अशा प्रकारचं तत्वज्ञान असणाऱ्या ह्या ग्रंथाची संत तुकाराम महाराजांनी शेकोडो पारायणे केलीत हा इतिहास आहे. इ.स.१५७१ साली एकादशीस सुरू झालेला हा ग्रंथ इ.स.१५७३ च्या कार्तिक पौर्णिमेला वाराणसी येथील पंचमुद्रा घाटावरील कॄष्ण मंदिरात पूर्णत्वास गेला. भाविकांतर्फे एकनाथी भागवताचे सामुदायिक पारायण सप्ताह आयोजित केले जातात.
भावार्थ रामायण
एकनाथांच्या प्रतिभेचे विवोधांगांनी दर्शन घडविणारा प्रचंड ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण हा नाथांचा शेवटचा ग्रंथ होय युद्धकांडातील ४४ व्या अध्यायापर्यन्तचे लिखाण नाथांचे असून ऊर्वरीत भागाची पूर्ती त्यांचे शिष्य गावोबा यांनी केली आहे.
रामायण लिहीण्याची प्रेरणा स्वत: प्रभू रामचंद्रानीच केल्याचे नाथ सांगतात. परंतु-
प्रेरिताही मी न करी जाण । तव स्वप्नामाजी रामायण
श्री राम विस्तारी संपूर्ण । ऊण खूण ग्रंथाची ॥ बा अ. ४ ओ ११
मज निजलो असता जाण । राम थापटी आपण ।
म्हणे उठी करी रामायण । तेथे मी कोण न करावया ॥ बाल.अ.४ ओ
अशा प्रकारे रामचंद्रानी मागे लागून हे रामायण लिहून घेतल्याच नाथ सांगतात. खरोखरच ह्या कामासाठी प्रभूरामचंद्रांनी केलेली नाथांची निवड म्हणजे आम्हा भारतीयांवर केलेले उपकारच आहेत.
भारत वर्षात अनेकांनी रामायणे लिहीली. परंतु उत्तआरेत तुलसीदासांच्या रामचरितमानसास ज्या प्रकारे प्रसिद्धि मिळाली त्याच प्रकारची प्रसिद्धि महाराष्ट्रात भावार्थ रामायणास लाभली आहे.महाराष्ट्रातल्या खेडयाखेडयात ह्या ग्रंथाची वर्षानुवर्षापासून आजही उपासना घडत आहे.
भावार्थ रामायाणा मध्ये नाथांनी अनेक कथांची गूफंण फुलांच्या एखादया देखण्या हारा प्रमाणे केलेली असून त्या मधुन दरवळणारा सुगंध हा नवरसांचा आहे.रामायाणातल्या अनेक कथांना सांप्रत काळाच्या चष्म्यातूनच नाथांनी पाहिल्याचे जाणवते. त्यांच्या काळातील परिस्थिती विदारक होती. दाढीवाल्या रावणाला मारण्यासाठी शिथिल झालेल्या वानरसेनेस आपल्या बलाची जाणीव करुन दिली ती नाथ वाङ्मसयानेच.
परकीय आक्रमकांनी महाराष्ट्रात आपले स्थान पक्केी करण्याचे कारस्थान सुरु केले असताना लोकांमध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले ते नाथांच्या भावार्थ रामायणानेच. रामायण पूर्तीनंतर अवघ्या काही वर्षातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा केवळ योगायोग म्हणावा का ?
रुक्मिणीस्वयंवर
एकनाथांचे रुक्मिणीस्वयंवर हे वारकरी संप्रदायातील पहिले आख्यान कथा काव्य असुन श्रीमद्भाागवताच्या दशम स्कंधातील ५२ व्या अध्यायावर आधारीत आहे. एकुण १८ प्रसंगांमधील विभागलेल्या हया ग्रंथाचे मुख्यत: तीन टप्पे आहेत
१) श्रीकृष्णवर्णन प्रेमपत्र, रुक्मिणी हरण, २) युध्द ३) विवाह वर्णन. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमांतून नाथांनी जीवाशिवाचं ऎक्य दाखवून अद्वैतभक्तीचा पुरस्कार केला आहे. नाथांचा हा ग्रंथ लोकप्रिय ठरला तो त्याच्या रुपकात्मक भाषेने आणि सुटसुटीतपणानं, लिहून पूर्ण केला. ग्रंथपठनानं कुमारिकांचे विवाह जुळतात, त्यानां योग्य अपेक्षीत वर प्राप्त होतो ही भावना जनमानसात असल्यानं हा ग्रंथ अधिक लोकप्रिय ठरला. श्रीखंडयाचे लग्न लावावे अशी नाथांच्या पत्नी गिरिजाबाई यांची इछा होती परंतु तत्पुर्वीच श्रीखंडयाच्या रुपातील श्रीकृष्ण गुप्त झाल्याने आपल्या पत्नीची ही इछा आपण वाड्म यरुपात पूर्ण करावी असे नाथांना वाटले असावे. इ.स.१५७२ साली काशीक्षेत्री रामनवमीच्या दिवशी रुक्मिणीस्वयंवर हा ग्रंथ त्यानी लिहुन पुर्ण झाला.
अभंग गाथा
वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी मुख्यत: ईश्वर नामसंकीर्तनासाठी, प्रार्थनेसाठी, आळवणीसाठी अभंगांची रचना केल्याचे दिसते परंतु नाथमहाराजांनी ह्या माध्यमाचा वापर एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता समाज प्रबोधनासाठी, रंजनातून भजनाकडे नेण्यासाठी केल्याचे जाणवते. अनेक विषयांच्या माध्यमातुन केलेल्या उपदेशामुळे त्यांच्या अभंग गाथेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. बाळ क्रीडेचे अभंग, गोप-गोपींचे खेळ, कॄष्णचरित्र, राम चरित्र, पंढरीमहात्म्य, विठ्ठल महात्म्य, शिवमहात्म्य, दत्तमहात्म्य, नाम महिमा, किर्तन महिमा, चिंतन महिमा, संत महिमा, सद्गुूरु महिमा, भक्तवत्सलता, पौराणिक कथानके, संतचरित्रे, हरिहर एकता, भगवत् रुपगुण वर्णन, अव्दैत, नीती, हिंदु-तुर्क संवाद, कलिप्रभाव, आत्मस्थितीपर अंभग, मुमुक्षुस उपदेश, मनास उपदेश, गौळणी आणि भारुड इ.च्या माध्यमातुन नाथांचे वाङ्म य प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीपर्यन्त पोचले. आपल्या अंभगाच्याच माध्यमातुन त्यांनी वारकरी संप्रदायात, भक्तसंप्रदायास "रामकॄष्ण हरि" मंत्राचा उपदेश केला. रामकॄष्ण हरि मंत्र हा सोपा । उच्चारिता खेपा खंडे कर्म ॥ अ.क्र.१८७ किंवा एकाजनार्दनी वक्त्रे । म्हणा रामकॄष्ण हरि ॥ माणसानं संसारात कसं असावं हे सांगताना नाथ लिहीतात - पांथस्थ घरासी आला । प्रात:काळी उठोनि गेला ॥ तैसे असावे संसारी । जैसी प्राचीनाची दोरी ॥ अशा प्रकारे आपल्या अनेक अभंगांच्या द्वारा नाथांनी पारमार्थिकास व सांसारिकास उपदेश केल्याचे दिसते. एकनाथांच्या वाङ्मआयाचं वेगळेपण म्हणजे त्यानी आपल्या वाङ्मनयात "एकनाथ म्हणे किंवा म्हणे एकनाथ" अशा प्रकारचा उल्लेख सहसा कुठेही केलेला आढळत नाही. त्यांनी वापरलेल्या नाममुद्रा ह्या त्यांचे सद्गु रु श्रीजनार्दन स्वामींच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत. जसे कि, एकाजनार्दनी, जनार्दनाचा एका, एकाजनार्दना शरण, शरण एकाजनार्दन, इ.इ. यावरुन नाथांची सद्गु्रुंवरील उत्कट भक्तीन प्रतीत होते.
चतु:श्र्लोकी भागवत
प्रस्तुत ग्रंथ हा एकनाथमहाराज लिखित पहिला ग्रंथ आहे असे मानले जाते. भगवंताने ब्रह्मदेवाला सृष्टीउत्पन्न करण्याची आज्ञा दिली परंतु हे कार्य कसे साध्य होणार याची चिंता ब्रह्मदेवाला लागून राहिली. पाण्याच्या तप-तप अशा आवाजानं तप करावं ही भगवंताची इच्छा जाणून त्यानं उग्र तपश्र्चर्या केली. प्रसन्न होऊन भगवंताने आपले चतुर्भुज रुप प्रकट करुन दर्शन दिले आणि केवळ चार श्लोकांच्या माध्यमांतून ब्रह्मदेवाला गुह्यज्ञान प्रदान केले. ब्रह्मदेवाने ते ज्ञान नारदास, नारदाने व्यासास, व्यासानी शुक्रदेवास दिले. श्रीमद्भाञगवताच्या दुसऱ्या स्कंधातील नवव्या अध्ययात चार श्लोकांच्या माध्यमांतून आपल्यासमोर प्रकट केले. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांपर्यन्त मराठीत पोचावे ह्यासाठी श्रीगुरु जनार्दन स्वामींच्या आज्ञेने इ.स. १५५१ च्या सुमारास नाथांनी हा ग्रंथ त्र्यंबकेश्वर क्षेत्री पूर्ण केला. प्रस्तुत ग्रंथात गुरुकॄपेचं, गुरुभक्तिचं वर्णन नाथ पदोपदी करतात. शिवाय माया, तप, वैकुंठमहिमा, नाममहिमा, हरिभक्तांची लक्षणं, समाधी, भागवताची दशलक्षणं यांच सुंदर विवेचन करुन नाथांनी सर्वांना उपकृत केले आहे.
शुकाष्टक
नित्य आत्मानंदात निमग्न असणाऱ्यानां कसलाच विधी निषेध नसतो या आशयाचे उद्गाेर काढुन आत्मा हा त्रिगुण रहित, विधीनिषेधांच्या अतीत आहे असं श्रीशुकाचार्य सांगतात, याच विषयावर नाथांनी मराठी भाषेतून टीका लिहून अवघड वेदांत सोपा करुन सांगितला आहे.
हस्तामलक
प्रस्तुत ग्रंथ म्हणजे श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या हस्तमलक या चौदाश्लोकी ग्रंथावर नाथांनी केलेली टीका होय. आचार्यांच्या ह्या मुळ चौदाश्लोकांवर भाष्यकरुन नाथांनी हे गृहयज्ञान सर्वांसाठी खुलं केलं. आत्मा हा नित्यतृप्त असून जगातले ज्ञान अथवा अज्ञान त्यास स्पर्षही करु शकत नाही. तो अलिप्त व असंग असा आहे. हा विषय रसाळ पद्ध्तीनं नाथांनी या ग्रंथात मांडला आहे.
स्वात्मसुख
सिध्द आणि साधकांना पथदर्शक ठरेल असा हा ग्रंथ असून यात सद्गु्रुंची महती नाथांनी गायिली आहे. स्वस्वरुप कसं आहे हे सांगून त्याच्या प्राप्तीचा उपाय नाथ सांगतात, सद्गुचरु हा काळाचा नियता आहे. ज्याला अभिमानाची बाधा जडेल त्याला मात्र स्वस्वरुपाची ओळख होऊ शकणार नाही हे ही नाथ सांगतात. ज्यांना परमार्थाची आवड आहे त्यांनी भावार्थाच्या माध्यमातून परमार्थ साधावा कारण भावाशिवाय परमार्थ घडू शकत नाही.
आनंद लहरी
आपल्याला झालेल्या आनंदाची प्राप्ती इतरांनाही व्हावी ह्या इच्छेपोटी नाथांची वाणी स्रवली ती आनंदलहरीच्यारुपात. जो सद्गुारुंना शरण जातो तो याच देहात मुक्तीाची अनुभूती प्राप्त करतो. याचि देही याच डोळा । भोगिजे मुक्तीचचा सोहळा ॥ ऎसा कोणी एक विरळा । तोचि जिव्हाळा स्वरुपाचा ॥ म्हणुन प्रत्येकानं सद्गुारुंना शरण जावं आणि आपलं जन्ममरण चुकवावं असं नाथ महाराज विनवितात.
चिरंजीवपद
आकारानं लहान असणाऱ्या ह्या ग्रंथात नाथांनी मुख्यत: साधकांस उपदेश केला आहे. मनुष्य जीवनाचं अंतिम साध्य अक्षय असं चिंरजीवपद प्राप्त करणं हे आहे त्यासाठी साधकानं काय करायला हंव काय नको याचा विचार सूत्ररुपाने मांडला आहे. ते पद प्राप्त करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे उत्तम मार्गदर्शक आहे. सदर ग्रंथ अनेक साधकांच्या नित्यपाठात असतो. त्रिविध वैराग्य, पंचविषय यांचे विवेचन करुन लोकेषमुळे साधक कशा प्रकारे मायाजाळात अडकतो त्यातून त्यानं कसं बाहेर पडावं हे देखिल नाथ सांगतात नाथ हे स्वत: उत्तम गॄहस्थ असल्याने प्रपंच आणि परमार्थाचा समन्व्य कसा साधावा हे या ग्रंथाच्या माध्यमातून नाथ स्पष्ट करतात.
हरिपाठ
हरिनामाचं महत्त्व सांगणारा नाथांचा हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला तो त्याच्या सोप्यापरमार्थ मांडणीमुळे श्रीज्ञानेश्वरांच्या हरिपाठाप्रमानेच श्रीएकनाथांच्या हरिपाठाचे नित्य पठण करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मुखानं हरिनाम उच्चारल्यास चिंता शिल्लक राहत नाही, पुन्हा जन्माच्या चक्रात अडकाव लागत नाही. जे मुखं हरिनामाचं गायन करीत नाही ते मुखं हे मुख नसून सापाचे बीळ आहे व ती जीभ ही जीभ नसून काळसर्प आहे असं नाथ सांगतात. हरिपदाची प्राप्ती ही भोळ्या भाविकांना होत असून अभिमानियांना गर्भवास सोसावा लागतो. कोणतेही कर्म करीत असताना हरिनामाचं उच्चारण करायला हवं कोटी-कोटी यज्ञ केल्यान ज्या फलाची प्राप्ती होते तीच प्राप्ती एका हरिनाम उच्चारानं होते, परंतु ते नाम आवडीनं, भावनेनं घ्यायला हवं नाथ शेवटी हरिपाठाचं फल सांगतात- नित्य प्रेमभावे हरिपाठ गाय । हरिकॄपा होय तयावरी ॥ हरिमुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥
ब्रिदावली
हा ग्रंथ म्हणजे नाथांचे गुरु जनार्दनस्वामी व नाथमहाराज ह्या दोघांच्या पहिल्या भेटीतील संवाद आहे. दौलताबादला गेल्यानंतर स्वामींनी नाथांना केलेले प्रश्न व त्याची नाथांनी दिलेली उत्त्रे अशा प्रकारची ह्या ग्रंथांची रचना आहे. शिवाय यात नाथांनी स्वामींची केलेली सेवा, स्वामींच्या मनात नाथां बद्ल््त् व्यक्ता झालेल्या भावना, दत्त दर्शनानंतर नाथांची झालेली स्थिती, गुरुपरंपरा या सर्वांचा समावेश आहे एकनाथी परंपरेत ह्या ग्रथांस विशेष महत्व असून श्रीएकनाथ महाराज पालखी सोहळ्यात, दिंडी सोहळ्यात व नाथवंशीय मंडळीत यास नित्यपाठणात म्हटले जाते.
भारुड
"भारुड" हा शब्द उच्चारताच आपल्या समोर येतात ते श्रीएकनाथ महाराज.लोकांमध्ये जाऊन, लोक कल्याणासाठी, लोकांच्या भाषेत, लोकसंगीताच्या पध्दतीनं, लोकनाथ असलेल्या एकनाथांची अलौलिक रचना म्हणजे त्यांची भारुडे होत. सुमारे चारशे वर्षानंतरही ह्याचा प्रभाव जनमानसावर कायम आहे. किंबहुना वाढत आहे हे विशेष. नाथांची भारुडे ही अनेक विषयांशी संबधित असून मुख्यत: कुटुंब जीवन, राजकारण, पशु-पक्षी, व समाजाच्या नित्यपरिचित अशा अनेक पात्रांची निवड त्यांनी आपल्या रचनेत केल्याचे दिसते. जसे कि, संसार, फुगडी, लग्न, अष्टपदी, होळी, गोंधळ, अभयपत्र, विनंतीपत्र, ताकीदपत्र, जाबचिट्ठी, वासूदेव, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा, भुत्या, संन्यासी, जोशी, जोहार, दरवेश, गारुडी, फकीर, जोगी, विंचू, वटवाघुळ, एडका, पिंगळा, इ. इ. भारुडं हि व्दिअर्थी असून एक वाच्यार्थ तर एक गुढार्थ आहे. जसे कि, सांगते तुम्हां वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा ॥ वाच्यार्थ- एकत्र कुटुंबाला व सासुरवासाला कंटाळलेली स्त्री आपल्या नवऱ्याला वेगळे निघण्यास सांगते. गुढार्थ- संतरुपी स्त्री लोकांना अनात्म पदार्थांचा संबंध सोडून परमार्थरुपी वेगळा संसार करण्याविषयी उपदेश करते. समाजाची सर्वार्थानं अवनती होत असताना, लोक अंधश्रध्देकडे वळत असताना नाथांचे भारुड म्हणजे एकप्रकारचा दीपस्तंभच कि, ज्याच्या प्रकाशाने समाजास सत्याचं ज्ञान झालं, ताप्तर्य, लोकरंजनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन हे नाथांच्या भारुडाचे वेगळेपण होय. सदयस्थित भारुडाला एकवेगळे परिमाण लाभले असून स्वतंत्रपणे भारुडाच्या मोठया आयोजनातून समाजप्रबोधनाचं काम केलं जातं, वारीच्या वाटेनं वारकऱ्यांच्या फडांमध्ये रंगणारे भारूड आता परदेशी नागरिकांचेही आकर्षण केंद्र बनले आहे.
एकनाथ नीति
माणसानं समाजात वावरताना कोणत्या पध्दतीनं वागावं ह्याचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ असून प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घालण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा हे सूत्ररुपानं नीती ह्या स्फुट प्रकरणात नाथांनी मांडलं आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment